Home Crime News पाकिस्तान ने केले भारत कधी करणार, बलात्कारी व्यक्तीला नपुंसक बनवण्याचा कायदा...

पाकिस्तान ने केले भारत कधी करणार, बलात्कारी व्यक्तीला नपुंसक बनवण्याचा कायदा संमत पाकिस्तानात!

483
0
SHARE

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या पुरुषाला रसायनांचा वापर करून नपुंसक बनवण्यात येण्याची तरतूद आहे.

भारतामद्ये ही जण माणसांमध्ये अशा कायद्याची अपेक्षा भारत सरकार कडून करताहेत कारण भारतामध्येही असे गुन्हे राजरोस होत आहेत

मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली.
या कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की गुन्ह्यात सामील असलेल्या लोकांचे नॅशनल रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. या अंतर्गत पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद असेल.
काही गुन्हेगारांना औषधी देऊन नंपुसक बनवण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे.
अशा घटनांची सुनावणी चार महिन्यात पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात येणार आहे.
लाहोर घटना
लाहोर शहरात एका महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्या पार्श्वभूमीवर नवा कायदा करण्यात आला आहे.
पीडित महिला, दोन मुलांसह लाहोरच्या दिशेने येत होती. हायवेच्या बाजूला तिच्यावर हल्ला करण्यात आला. अत्याचारावेळी दोन्ही मुलं घटनास्थळी होती.
या घटनेसाठी पीडित महिलाच जबाबदार असल्याचं वक्तव्य लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याने आणि नृशंस घटनेनं जनमानसात रोष पसरला.
देशभरात आंदोलनं, निदर्शनं करण्यात आली. यासंदर्भात कठोर कायदा करू असं सरकारला आश्वासन द्यावं लागलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यातच या अध्यादेशाला मंजुरी दिली होती. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी मंगळवारी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. इम्रान खान सरकारला आता पुढच्या 120 दिवसात हे विधेयक संसदेत मांडावं लागेल. जेणेकरून त्याला स्थायी स्वरुप प्राप्त होईल. तोपर्यंत हा कायदा लागू होईल.
कायद्याला विरोध
पाकिस्तानात काहीजणांचा या कायद्याला विरोधदेखील आहे.
ही सजा अत्यंत कठोर असल्याचं काहींचं म्हणणं आहे. हा कायदा पारित करण्यापूर्वी सरकारने पुरेसा विचार-विमर्श केलेला नाही असं या कायद्याला विरोध असणाऱ्यांचं म्हणणं आहे.
जगातल्या अन्य काही देशांमध्ये महिलांवर अत्याचार किंवा त्यांचं शोषण केल्याप्रकरणी दोषी पुरुषाला नपंसुक करण्याची तरतूद कायद्यात आहे.
लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरणाऱ्या आरोपींच्या शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोनची पातळी औषधांच्या माध्यमातून कमी करण्यात येते.
इंडोनेशियात लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अपराध्यांना नपंसुक करण्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. 2009 मध्ये पोलंडने लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्या प्रौढांना नपुंसक करण्याची शिक्षा निश्चित केली.
गेल्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये लैंगिक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासंदर्भात जनजागृती झाली आहे.
2015 मध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्याचा व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता.
अशा स्वरुपाचे व्हीडिओ किंवा कोणताही मजकूर छापण्यास, प्रकाशित करण्यास, प्रसारित करण्यावर पाकिस्तानमध्ये शिक्षेची तरतूद नाही किंवा तसा कायदाही नाही.