Home Crime News मुंबईत सुटकेसमध्ये सापडलेल्या अवयवांचं गूढ उकललं; मुलीनंच काढला बापाचा काटा

मुंबईत सुटकेसमध्ये सापडलेल्या अवयवांचं गूढ उकललं; मुलीनंच काढला बापाचा काटा

268
0
SHARE

प्रेमाला बॅनोटो यांचा विरोध होता. त्यात बॅनोटो यांनी संपत्ती आपल्याला मिळावी, यासाठी तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बॅनोटो यांची हत्या करण्याचा 

माहिम येथील मर्डर मिस्ट्री सोडवण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. मुंबई पोलिसांच्या युनिट 5 ने समुद्र किनारी सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचा छडा लावायला आहे. गुन्हे शाखेने वाकोल्यातून 19 वर्षीय तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहेय प्रेमात अडथळा ठरल्याने मुलीने बापाचा काटा काढला. एवढेच नाही तर गुप्तांगासह अवयव कापून ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पोलिसांनी फेसबुक प्रोफाइल वरून मयत व्यक्तीची ओळख पटवली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील एक पंचतारांकीत हॉटेलमध्ये म्युझिक शो आर्टिस्ट बॅनोटो रिबेलो (वय-62) हे सांताक्रुझ (पूर्व) येथील वाकोला मशीद येथे एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी आरोपी मुलीला दत्तक घेतले होते. या तरुणीचे तिच्या पेक्षा 3 वर्षे वयाने लहान असलेल्या मुलाशी प्रेमसंबंध होते. त्याला बॅनोटो यांचा विरोध होता. त्यात बॅनोटो यांनी संपत्ती आपल्याला मिळावी, यासाठी तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बॅनोटो यांची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी बॅनोटो यांची राहत्या घरी हत्या केली. बांबू आणि चाकूने मारहाण करुन ही हत्या करण्यात आली. बॅनोटो रिबेलो हे मरत नसल्याने त्याच्या तोंडावर हिट स्प्रे मारण्यात आला. एवढेच नाही तर त्यांच्या मृत शरीराचे तीन भागात तुकडे केले. ते वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून तिन्हीही सुटकेस मिठी नदीच्या पात्रात फेकून दिले. त्यातील एक सुटकेस पोलिसांना माहिम दर्ग्याच्या मागे समुद्रात सापडली. त्यात पोलिसांनी एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांग सापडले. यामुळे एकच खळबळ उडाली.
अशी सुटली ‘मर्डर मिस्ट्री’

या प्रकरणी माहिम पोलिसांच्या अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या हत्येचा तपास गुन्हे शाखा कक्ष क्रं.5 कडे सोपवण्यात आला. पोलिसांना समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयवांसोबत एक शर्ट, पॅंट होती. शर्टच्या कॉलरवर ‘अल्मो’ टेलरचे लेबल होते. ‘अल्मो’ टेलर हा कुर्ला (पश्चिम) येथील बेलग्रामी रोडवर आहे. पोलिसांनी तिथे चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली. या कामात पोलिसांनी फेसबुकचीही मदत घेतली. नंतर पोलिसांनी बॅनोटो यांच्या दत्तक मुलीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच रिया रिबेलो आणि तिच्या सोळा वर्षीय प्रियकराने गुन्हा कबूल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here