Home Storys भारत बंद ! वर केंद्र सरकार चा इशारा.

भारत बंद ! वर केंद्र सरकार चा इशारा.

164
0
SHARE

आज विविध कामगार संघटनांनी काम बंद ची हाक दिली आहे !
संपावर गेलात तर परिणाम भोगाल, केंद्राचा कर्मचार्‍यांना इशारा
कामगार सुधारणा, थेट विदेशी गुंतवणूक तसेच खाजगीकरणाला विरोध करीत देशभरातील कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या संपात सामील झालात तर त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार रहा, असा इशारा केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना दिला आहे. आरएसएसशी संलग्‍न असलेली भारतीय मजदूर युनियन वगळता सर्व कामगार संघटनांनी सरकारच्या धोरणाविरोधात संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनीदेखील संपाची हाक दिलेली असल्याने बँकांचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सामाजिक सुरक्षितता आणि किमान वेतनाच्या हमीसह बारा मागण्या केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत.
आपल्या मागण्यांसाठी कामगार संघटनांनी बुधवारी संपाची हाक दिली आहे. मात्र या संपात सामील झालात तर परिणाम भोगण्यासाठी तयार रहा, असा इशारा कार्मिक मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनाद्वारे केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना दिला आहे. जे कर्मचारी संपात सामील होतील, त्यांचे वेतन कापले जाईल तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच सर्व केंद्रीय विभागांसाठी हा आदेश लागू असल्याचे कार्मिक मंत्रालयाने नमूद केले आहे.
कर्मचार्‍यांना संघटना स्थापन करण्याचा हक्‍क असला तरी त्याद्वारे संप किंवा निदर्शने करता येत नाहीत. संपावर जाण्याची तरतूद नियमावलीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या अनेक निवाड्यांमध्ये संपाचे हत्यार उगारणे बेकायदा असल्याचे स्पष्टपणे सांगितले असल्याचे कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे. बुधवारी केंद्र सरकारी कर्मचार्‍यांनी किरकोळ आणि इतर कारणांसाठी रजा घेऊ नये, असेही कार्मिक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here