Home Crime News मुलुंड मधील घटना M.S.C.B ला चंपत लावणारी टोळी गजाआड.

मुलुंड मधील घटना M.S.C.B ला चंपत लावणारी टोळी गजाआड.

197
0
SHARE

मुलुंड मद्ये काही दिवसान पासून काही महाभाग लोकांना लाईट चे बिल कमी करतो म्हणून म्हणून 8000 ते 10000 रुपये इतकी रक्कम घेऊन लाईट मीटर मद्ये काही तांत्रिक बदल करुन देत होते, पण ह्या अस्या तांत्रिक बदला मुळे M.S.C.B ला तर चंपत लागतच होती पण ह्याचा भार बाकी च्या विद्युत ग्राहकांनवर ही पडत होता.

गुन्हे शाखेच्या अटकेत असलेले दोन्ही आरोपी लोकांना वीज चोरी करण्याकरीता प्रोत्साहित करुन एका मिटरच्या मागे त्यांच्याकडून 10,000 रुपये घेत होते. अशीच माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुशंगाने सापळा रचून एका बोगस ग्राहकाला तयार करुन दोघांना मुलुंड परिसरातून अटक करण्यात पोलिसांना 17 जानेवारी रोजी यश मिळालं.
खरंतर हे दोन्ही आरोपी इलेक्ट्रिक मिटरमध्ये फेरफार करत होते.
ते मिटरची सील उघडून त्याच्या सर्किटमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवत होते आणि नंतर पुन्हा मिटर जशाच्या तसं करून देत होते. त्यामुळे याबद्दल लोकांना किंवा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना काही कळत नव्हत आणि विद्युत चोरी होऊन महावितरणला चुना लावला जात होता.
अटक आरोपी हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांना 23 जानेवारी 2020 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र, पुढील तपास सुरू आहे. तसंच या दोघांनी आणखी कुठे कुठे आणि किती विद्युत मिटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवलं आहे आणि त्यांच्या या रॅकेटमध्ये इतर कोण कोण आहे ? याचा तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here