Home Storys प्रजासत्ताक दिवस : प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी विशेष.

प्रजासत्ताक दिवस : प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी विशेष.

218
0
SHARE

प्रजासत्ताक दिवस : प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हिंदू पंचांगा नुसार ‘माघ’ महिन्यात आला आहे , आच्छा तर मग आपल्या पैकी किती भरतीयांना माहीत आहे 26 जानेवारी संदर्भात खास करून शाळेय विद्यार्थी व युवावर्ग हयांना.
तर काहींचे म्हणे आहे ह्यच्यात काय “सुट्टी चा दिवस आणि सुट्टी म्णजे आराम आणि मौज “

अरे होय आज तुम्हाला आम्हाला सुट्टी अनुभवता यावी त्याच साठी तर तुमच्या आमच्या पुरखांनी आपले रक्त सांडले होते स्वतचे प्राण पणाला लावले होते ‘होय हा तोच तो दिवस ज्यामुळे तुम्ही आम्ही मोकळ्या पणाने सुट्टी साजरी करू शकतो, मूवी बगायला जाऊ शकतो,आजचे जीवन स्वातंत्र्याने व अभीमानाने जगू शकतो,हा तोच तो दिवस मित्रांनो. मनात असा प्रश्न येतो कि काही भारतीयांना आज चा दिवस हा फक्त सुट्टी मिळण्याचा, व काही देश प्रेमी जणांना आज च्या दिवशी देश प्रेम प्रकट होण्याचा दिवस म्हणून साजरा होतो ‘ हो असावे मला त्याचा विरोध नाही तुम्ही फक्त आजच्या दिवसा पुरते का होईना देश प्रेमाचे गाणे लावावेत,मोबाईल च्या D.P बदलाव्यात स्टेटस बदलावेत, पण हो स्टेटस फक्त मोबाईलचेच नाही तर स्वतःचे पण, कारण असे आहे कि आपल्याला

स्वतंत्रवीरांनी आपले रक्त वाहून मिळून दिलेल्या ह्या स्वातंत्र्य चा मूळ उद्देश हा विसरता कामा नये, आज आपल्याला कोना परकीयांशी लढण्याची गरज नाही तर गरज आहे स्वतहला घडवण्याची, स्वतःच्या विचारांनी कर्तृत्वाने ह्या देशाला पुढे नेण्याची गरज आहे. पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची,आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात देश हिताच्या भावाने समर्पित होण्याची, गरज आहे आपले उद्देश ठरवण्याची, जबाबदारी घेण्याची,
हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे.
आजच्याच दिवसी Dr.बाबासाहेब आंबेडकर ह्या महा मानवाने संविधान ह्या देशाला अर्पण केले,व त्यांनी ह्या संविधाना द्वारे सर्व भारतीयांना सामान न्याय दिला, जर आपण सर्वानी ह्याचे काटेकोर पालन केले तर खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा होऊ शकतो “आपल्या जीवनातून लाचखोरी चा समूळ नासकरून, एकमेकांना बंधुत्वाने व आदर भावाने सन्मान देऊन’ रस्त्या वरचे नियम पाळून, स्वच्छता राखुन,नशेला कायम चे बंद करुन, स्वतःची व देशाची प्रगती करुन ‘ज्या वेळी ह्या समाजात हे सर्व घडेल त्याच वेळी खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन.
आजच्या इतिहास विषयी काही ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here