Home Crime News हे काय चाललंय ! कुठे आहेत ते मानव अधिकार आणि त्याचे ठेकेदार.

हे काय चाललंय ! कुठे आहेत ते मानव अधिकार आणि त्याचे ठेकेदार.

292
0
SHARE

यहा सब गोलमाल हे !आजची ही परिस्थिती बघून असंच काहीसे वाटत आहे ! भारत हा असा देश आहे जेथे सर्व धर्म समभाव या भावनेने राहतात’ येथे संविधान हे सर्व श्रेष्ठ व सर्वमान्य आहे !येथे सर्व नागरिकांचे मानव अधिकार जपले जातात!

ANI Video

पण मग संविधानाचे संरक्षण करत्यालाच मानवी अधिकार नाही, हाच मोठा गहन प्रश्न आहे, मी माझ्या पोलिसांबद्दल बोलतोय हे दिवस रात्र तुमचे आमचे संरक्षण करतात आज त्यांचेच मानवधिकार हरवलेत,
पोलीस बांधवांनी जर काही केले कोणत्याही गुन्हेगारावर कार्यवाही व न्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो दोषी ठरवला जातो,
पोलिसांचे निरंतर खच्चीकरण होत असते, कधी नेत्यांकडून तर कधी मोठ्या बापाच्या पोरांकडून, कधी कोर्टात तर कधी वकिलांकडून आज माझ्या पोलीस बांधवांना पडलेला मोठा प्रश्न हाच आहे!
काहीतरी देशासाठी करण्याच्या जोमाने पोलिसात तर आलो, खाकी घातल्या वरती रुबाब वाढला जबाबदाऱ्या वाढल्या शासनाने लोकांच्या संरक्षणासाठी पिस्तूल पण दिली, पण कशासाठी दिले हे खेळणे!
जेव्हा न्याय करण्यासाठी याचा वापर करता येत नाही हातात बेड्या तर गुन्हेगाराच्या घातल्या जातात पण पूर्ण शरीर बेड्यात अडकलेल्या माझ्या पोलीस बांधवांचे काय ज्याला स्वतःचे संरक्षण करताना पण नियम पाळावे लागतात जर कोणता गुन्हेगार मारला गेला तर हे मानव अधिकारी हाहाकार करतात पण, जर माझा पोलीस बांधव मारला गेला, कुठे जातात हे सर्व
पोलिसांना परिवार नाही का,भावना नाहीत त्यांना वेदना नाही होत का..?
काल परवा चे दृष्य पाहिले गुजरात चे, ते NRC / CAA च्या विरोधासाठी आंदोलन करण्र्यानी पोलिस बांधवांना बेदम मारहाण केली काय चुक होती त्यांची अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरती देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाहिजे, अशी कोणती आई आपल्या मुलांना पोलिसात पाठवेल,जेव्हा त्यांचेच मानवाधिकार नाहीत, मी हे नाही बोलत की सर्वच पोलीस दुधानी धुतले आहेत आहेत काही भ्रष्ट जे कायद्याचा स्वतः च्या फायद्या साठी उपयोग करतात पण सर्वच नाही असे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here