Home Job Updates पुणे येथे – बेरोजगार तरुणांसाठी नौकरी ची संधी !

पुणे येथे – बेरोजगार तरुणांसाठी नौकरी ची संधी !

130
0
SHARE

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नायगांव एज्युकेशन सोसायटीचे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रॅव्हिटी कन्सल्टन्टस नारायण पेठ यांच्या वतीने मंगळवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता दौंड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे रोजगार मेळावा २०२०

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील बारामती, जेजुरी, कुरकुंभ आणि पुणे शहर औद्योगिक परिसरातील एकूण 24 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून एकूण 701 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता या मेळाव्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किमान 7 वी पास ते 10 वी, 12 वी पास/नापास व एमसीव्हीसी पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, एमबीए, एम.फार्म, सीएनसी ऑपरेटर पात्रता धारण केलेल्या सर्व उमेदवारांनी या मेळाव्याअंतर्गत खासगी क्षेत्रातील उपलब्ध जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे.
मुलाखतीस येताना उमेदवारांने आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here