Home Job Updates पोलीस दलात 2144 पदांची भरती

पोलीस दलात 2144 पदांची भरती

141
0
SHARE

Police Bharti 2019 – Latest News & update about Maharashtra Police Bharti 2019. राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुक कोंडीच्या प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी 2144 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3 उपायुक्त, 6 उपअधीक्षकांसह 27 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत सर्वाधिक 620 पदे भरण्यात येणार आहेत. गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे.
Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020 – 2019 update is available for the candidates. Its really amazing news For all of you that the Police bharti Phase 2 expected Soon. As per the Current News Police Bharti is expected for the 2144 vacancies in all over Maharashtra. To avoid the Road accidents state government has taken a aggressive step to recruit a new Police squads which will help to avoid accidents. More updates are given below.
उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनेनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागांची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठांकडून सांगण्यात आले. 2013 मध्ये उच्च न्यायालयात वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या होत्या.
उच्च न्यायालयाने वाहतुक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मीती करण्याची सुचना दिली होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटवणे या जबाबदाऱ्या प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतुक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची 2144 पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव यावर्षी 23 जानेवारीला गृह विभागाला सादर केला होता.
नव्याने निर्माण करण्यात येणारी सवर्गनिहाय पदे

  • अधीक्षक -1
  • उपअधीक्षक -6
  • निरीक्षक – 27
  • सहायक निरीक्षक – 63
  • उपनिरीक्षक – 108
  • सहायक फौजदार – 126
  • हवालदार – 379
  • शिपाई – 1143
  • चालक शिपाई – 289

 *लेखी परीक्षेचे स्वरूप 

पोलीस भरती प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

हि परीक्षा मराठी भाषेत घेतली जाईल.

हि लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

  • गुणांचे विभाजन खालील विषयानुसार असेल. 
  •  विषय गुण
  • अंकगणित=25 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी=25 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी=25 गुण
  • मराठी व्याकरण=25 गुण
  • एकूण गुण – 100
  • शारीरिक चाचणी कशी असेल? 

लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.

शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
शारीरिक चाचणी (पुरुष)

  • Physical Exam Details For Male Candidates
  • 1600 मीटर धावणे=30 गुण
  • 100 मीटर धावणे=10 गुण
  • गोळाफेक =10 गुण
  • एकूण गुण 50 गुण

शारीरिक चाचणी (महिला)

Physical Exam Details For Female Candidates

  • 800 मीटर धावणे-30 गुण
  • 100 मीटर धावणे-10 गुण
  • गोळाफेक (4 किलो)-10 गुण
  • एकूण गुण50 गुण

परीक्षा शुल्क (Fees For Police Bharti)

खुल्या प्रवर्गातील उमेदवार- रुपये 450
मागासवर्गीय उमेदवार- रुपये 350
Police Bharti 

The second Phase of Police Bharti is expected Soon. Last day there was s news about the SRPF Police Bharti 2019. This News was about the SRPF Department which is expected to begin from 2nd December 2019. The last police bharti Examination & selection process are till pending.
So We can say that now recruitment process are under full speed. Very Soon the MahaBharti 2020 is starting For 70,000 Vacancies. These all are really golden opportunities for all you candidates. So get ready for this Police Bharti 2019.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here