Home Crime News मोठी बातमी- मुंबई मद्ये अंधेरी ओशिवऱ्याच्या ‘पाटलीपुत्र’ सोसायटीत सेक्स रॅकेट.

मोठी बातमी- मुंबई मद्ये अंधेरी ओशिवऱ्याच्या ‘पाटलीपुत्र’ सोसायटीत सेक्स रॅकेट.

107
0
SHARE

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे असलेल्या ‘पाटलीपुत्र‘ या हायप्रोफाईल सोसायटीच्या इमारतीत सुरू असणारे सेक्स रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. ओशिवरा पोलिसांनी या सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका केली आहे. हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या शबाना अब्दुल सत्तार या महिलेला पोलिसांनी अटक केली असून ती व्हॉट्सएपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या सोसायटीत आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचेदेखील फ्लॅट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पश्चिम उपनगरातील ओशिवऱ्यात असलेल्या ‘पाटलीपुत्र’ या हायप्रोफाईल सोसायटीतमध्ये बहुतांश फ्लॅट आयएस आणि आयपीएस अधिकारी यांच्या मालकीचे आहेत, मात्र हे अधिकारी या फ्लॅटमध्ये राहण्यास नसून हे फ्लॅट भाडेतत्वावर देण्यात आलेले आहेत.
अशाच एका भाडेतत्वावर देण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये ‘सेक्स रॅकेट’ चालवण्यात येत असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बुधवारी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला असता या फ्लॅटमध्ये एका अल्पवयीन मुलीसह दोघी जणी होत्या. पोलिसांनी या दोघींची सुटका करून हे रॅकेट चालवणारी शबाना अब्दुल सत्तार (४५) या महिलेला अटक केली आहे.
अटक केलेल्या शबानाच्या संपर्कात पश्चिम उपनगतील अनेक दलाल असून या दलालांमार्फत शबाना हे सेक्स रॅकेट चालवत होती. या व्यवसायासाठी शबाना आणि तिचे दलाल व्हॉट्सएपचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते, अशी माहिती समोर आली आहे. मुलींचे फोटो व्हॉट्सएपवर पाठवून ते दलालांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचत होते. मुलीचे दरदेखील व्हॉट्सएपवर ठरवले जात होते. पेमेंट ऑनलाईन केले जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत समोर आला. शबानाच्या संपर्कात मुंबईत मॉडेलिंग करण्यासाठी आलेल्या परराज्यातील काही तरुणीदेखील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या शबाना सत्तार या महिलेविरुद्ध ‘पिटा’अतंर्गत तसेच पॉस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तिला स्थानिक न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here