Home Uncategorized १० वित (८९%) उत्तीर्ण प्रगतीचे आत्मकथा..

१० वित (८९%) उत्तीर्ण प्रगतीचे आत्मकथा..

239
0
SHARE

नागपूर – कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! मी प्रगती( बदललेले नाव) ही माझी कहाणी आहे, मी दहावीत ८९ % मिळवून उत्तीर्ण झाली होती खूप आनंदित खूप हसमुख प्रेरणादायी आणि प्रोत्साहित असा माझा स्वभाव मला खूप शिकून मोठे होऊन देशसेवा करण्याची होती, सर्वसाधारण मुलींन प्रमाणे माझेही खूप स्वप्न होते, पण..पण माझ्या आईच्या प्रेमाने मला वेश्याव्यवसायात ढकलले,

https://youtu.be/1Scf4TnOXrM
श्रोत -फ्लॉप ट्यूबअर

आईच्या प्रेमाने याचा अर्थ “माझ्या आईच्या दुसऱ्या नवऱ्याने” माझे वडील बारा वर्षाच्या वयात वारले, व नंतर घर चालवण्यासाठी माझ्या आईने दुसरा नवरा केला, व माझ्या दहावीनंतर त्यांनी मला या व्यवसाय ढकलले
मी नागपूरच्या वेश्या खाण्यात एक वैश्या म्हणून काम करते,
प्रश्न- या व्यवसायातून तुम्हाला किती पैसे मिळतात..?
मी तरुण आहे म्हणून पाच – सहा हजारापर्यंत मिळतात,
मला अजुनही शिकण्याची खूप इच्छा आहे, लोकांचा दृष्टिकोन आमच्याकडे बघण्याचा वेगळाच असतो, मी खूप वेळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, नोकरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण सामाजिक दृष्टिकोन आड येतो! पण मी शिकले व स्वावलंबी होईल आणि एक दिवस या नरकातून बाहेर पडेल.
(आज काही प्रश्न सोडत आहे तुमच्या साठी आज कन्या दिन आहे, कन्यारत्न म्हणजे साक्षात लक्ष्मी, परी, मानणारे आपण जेव्हा प्रश्न आपल्या आई, बहिण बायको चा येतो तेव्हा आपला दृष्टीकोण वेगळा असतो, पण तेच जेव्हा आपण पर स्त्री कडे बघतो तेव्हा मात्र पूर्ण वेगळा “हे सर्वां साठी नाही पण काही आहेत “काय आपले संस्कार एवढे मलीन झाले आहेत) विचार करा नक्की.