Home Uncategorized गुंतवणूक न करताही राज ठाकरेंना २० कोटींचा नफा? ईडी

गुंतवणूक न करताही राज ठाकरेंना २० कोटींचा नफा? ईडी

111
0
SHARE

मग त्यांना २० कोटींचा नफा कसा झाला? या प्रश्नाने ईडी सध्या बुचकळ्यात पडली असून पुन्हा एकदा राज ठाकरे यांची चौकशी केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
सक्तवसुली संचलनालयातर्फे आयएल अँड एफएस कंपनीच्या कर्जवाटप गैरव्यवहाराची चौकशी सुरु आहे. याच कंपनीने कोहीनूर स्क्वेअर प्रोजेक्टमध्ये भागीदारी केली होती, तसेच कर्जही दिले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि व्यावसायिक उन्मेष जोशी यांनी केपीपीएल कंपनीची स्थापना केली होती, मात्र २००५ साली कोहीनूर सीटीएनल कंपनीच्या माध्यमातून कोहिनूर स्क्वेअर प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली. ज्यामध्ये कोहीनूर सीटीएनलची ५१ टक्के भागीदारी होती तर IL & FS कंपनीची ४९ टक्के भागीदारी होती.
IL & FS या कंपनीने एकून २२५ कोटींची गुंतवणूक कोहिनूर सीटीएनलमध्ये केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी अवघ्या ९० कोटी रुपयांमध्ये आपले समभाग कोहिनूर सीटीएनएलला विकून टाकले होते. यामुळे IL & FS कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
मातोश्री रिअल्टर्सने ४० कोटींची गुंतवणूक केली
राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीत जरी त्यांनी स्वतः गुंतवणूक केली नसल्याचे सांगितले. मात्र त्यांचे भागीदार राजन शिरोडकर यांनी मातोश्री रिअल्टर्सने कोहिनूर सीटीएनलमध्ये ४० कोटींची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. मातोश्री रिअल्टर्सने केलेल्या चार कोटी गुंतवणूकीचे दस्ताऐवज ईडीला मिळालेले आहेत. मात्र उर्वरित ३६ कोटींची गुंतवणूक कशी केली? त्याचा करार कधी झाला होता? याबाबतचा तपास आता ईडीमार्फत केला जाणार आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची ईडीने २२ ऑगस्ट रोजी कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स प्रकरणात साडे आठ तास चौकशी केली होती. कोहिनूर स्केअर टॉवर्स प्रोजेक्टमध्ये राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची मातोश्री रिअल्टर्स ही कंपनी भागीदारीमध्ये होती. मात्र २००८ मध्ये कोहिनूर स्क्वेअरच्या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यानंतर मातोश्रीने आपल्याकडील हिस्सा कोहिनूर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला विकला. ज्यातून त्यांना ८० कोटी रुपये मिळाले होते. यापैकी राज ठाकरे यांना २० कोटींचा नफा झाला. उर्वरीत ६० कोटींची रक्कम मातोश्रीच्या इतर सात भागीदारांना देण्यात आली होती. ईडीच्या चौकशीत राज ठाकरे यांनी कोणतीही गुंतवणूक केली नाही, असे सांगितले होते.
मग त्यांना २० कोटींचा नफा कसा झाला? या प्रश्नाने ईडी सध्या बुचकळ्यात पडली असून पुन्हा एकदा राज ठाकरे यांची चौकशी केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
सक्तवसुली संचलनालयातर्फे आयएल अँड एफएस कंपनीच्या कर्जवाटप गैरव्यवहाराची चौकशी सुरु आहे. याच कंपनीने कोहीनूर स्क्वेअर प्रोजेक्टमध्ये भागीदारी केली होती, तसेच कर्जही दिले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि व्यावसायिक उन्मेष जोशी यांनी केपीपीएल कंपनीची स्थापना केली होती, मात्र २००५ साली कोहीनूर सीटीएनल कंपनीच्या माध्यमातून कोहिनूर स्क्वेअर प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली. ज्यामध्ये कोहीनूर सीटीएनलची ५१ टक्के भागीदारी होती तर IL & FS कंपनीची ४९ टक्के भागीदारी होती.
IL & FS या कंपनीने एकून २२५ कोटींची गुंतवणूक कोहिनूर सीटीएनलमध्ये केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी अवघ्या ९० कोटी रुपयांमध्ये आपले समभाग कोहिनूर सीटीएनएलला विकून टाकले होते. यामुळे IL & FS कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
मातोश्री रिअल्टर्सने ४० कोटींची गुंतवणूक केली
राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीत जरी त्यांनी स्वतः गुंतवणूक केली नसल्याचे सांगितले. मात्र त्यांचे भागीदार राजन शिरोडकर यांनी मातोश्री रिअल्टर्सने कोहिनूर सीटीएनलमध्ये ४० कोटींची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. मातोश्री रिअल्टर्सने केलेल्या चार कोटी गुंतवणूकीचे दस्ताऐवज ईडीला मिळालेले आहेत. मात्र उर्वरित ३६ कोटींची गुंतवणूक कशी केली? त्याचा करार कधी झाला होता? याबाबतचा तपास आता ईडीमार्फत केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here