Home Uncategorized #Aarey Forest :आरे ची कत्तल सुरु !144 लागू.

#Aarey Forest :आरे ची कत्तल सुरु !144 लागू.

86
0
SHARE

Mumbai- 5/10/19 आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले
कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं. रात्रभर पोलीस आणि आंदोलकामध्ये घमसान झालं. आंदोलन शांत करण्यासाठी आणि वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आंदोलकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी रात्री तिथेच धरणे आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी एक-एक करून आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तरिही अनेक आंदोलक आरेमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण मांडून होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना परतण्याचं आवाहनही केलं. अखेर रात्री तीन वाजेच्या सुमारास सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर आरेमध्ये पुन्हा झाडं कापण्यात आली. जवळपास ४०० झाडांची रात्रीत कत्तल केल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी आरेतील मेट्रोची कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here