Home Uncategorized मुंबईत तब्बल 73 कोटींची पाणी चोरी उघड, आरोपींवर गुन्हा दाखल

मुंबईत तब्बल 73 कोटींची पाणी चोरी उघड, आरोपींवर गुन्हा दाखल

111
0
SHARE

मुंबई । राज्यात दुष्काळी भागात पाण्यासाठी अजूनही पाण्याची चणचण सुरू आहे. मुंबईत ही काही भागात मुबलक पाणी मिळत नाही, अस असताना मुंबईत तबबल 73 कोटींची पाणी चोरी उघड झाली आहे. या पाणी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यात भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने विविध भागांमध्ये पाण्याचे दुर्भक्ष निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भूजल चोरीची गंभीर घटना उघड झाली आहे. सुमारे 73 कोटी रुपयांचे पाणी चोरण्यात आल्याने गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काळबादेवी बोमनजी मास्टर लेनमध्ये असलेल्या पांड्या मेंशनचे मालक व इतरांवर आरोप आहे की, त्यांनी गेल्या 11 वर्षांपासून पाण्याच्या टॅंकरवाल्यांसोबत सुमारे 73 कोटी रुपयांचे पाणी चोरले आहे.


याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. भादंवि कलम 379 आणि कलम 34 अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये पांड्या मेंशनचे मालक आणि त्यांच्या कंपनीचे दोन संचालक यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आपल्या जागेत परवानगी न घेता अवैधरित्या विहिरी खोदल्या होत्या.
2006 ते 2017 पर्यंत या आरोपींनी 73.19 कोटी रुपयांच्या जमिनीखालील पाणी विकले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने या विहिरी कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तबबल 11 वर्ष ही पाणी चोरी खुलेआम सुरू होती. या विहीरींना कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना ही पाणी विक्री करण्यात येत होती. हा सर्व प्रकार सुरेश कुमार धाक यांनी उघड केला. वारंवार तक्रार करून दखल घेतली जात नव्हती. अखेर पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. 73 कोटींची पाणी विक्री झाली असं पोलिसांना सांगितल्यावर तक्रार दाखल करून घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here